जागतिक मातृदिनी कोरोना रुग्णांना मदत करून मुलांनी दिली आईला आदरांजली

फैजपूर, प्रतिनिधी । कोरोना काळात संकट जरी मोठे असले तरी  मदत करणारे हात पुढे येत आहे. अनेक लोक त्यांना शक्य तेव्हढी मदत करत आहे. याचा प्रत्यय सेवानिवृत्त मुख्याध्यापक जानकीराम काशीराम कोल्हे  व त्यांचे सुपुत्र हरीश कोल्हे ,मुलगी जवाई यांनी केलेल्या सेवा कार्यातुन आला आहे.

जानकीराम कोल्हे यांच्या पत्नी सेवा निवृत्त उपशिक्षिका नलिनी जानकीराम कोल्हे  यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनानंतर कोरोनाची  परिस्थिती पहाता सर्व विधी लहान स्वरुपात करून ,त्यांच्या स्मरणार्थ रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा मानून कोल्हे परिवाराने ग्रामीण रुग्णालय न्हावीला कोरोना रुग्णांसाठी गरम -ठंड -कोमट पाणी  मशीन भेट दिले. जेणेकरून कोरोना रूग्णांना आवश्यक असलेले  पाणी भेटेल. त्यासोबत रुग्णांना व त्यांच्या नातेवाईक यांना बसन्यासाठी ५  बाकडे देणार आहे. या कार्यामुळे स्व.नलिनी कोल्हे  जरी देहरूपी अस्तिवात नसल्या तरी त्यांची आठवण या सत्कार्यामुळे स्मरणात राहिल. आईच्या स्मृतिप्रीत्यर्थ केलेल्या या उपक्रमांचे सर्वांनी कौतुक केले. याप्रसंगी डॉ. कौस्तुभ तळेले, डॉ. अभिजीत सरोदे,डॉ. प्रसाद पाटिल, रीता धांडे, मोहिनी भारभार,  मिलिंद धांडे, मोहिनी भारंबे, संतोष चौधरी, संदीप महाजन, जयश्री धांडे, न्हावी स्टाफ उपस्थित होते व  सर्वांचे सहकार्य लाभले.

 

Protected Content