आषाढी एकादशीसाठी दहीगाव येथील श्री विठ्ठल मंदिर सजले

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आषाढी एकादशीच्या निमित्ताने तालुक्यातील दहीगाव येथील श्री विठ्ठल मंदिरात दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतील हजारो भाविक दाखल होणार असून यानिमित्त मंदिरात चोख व्यवस्था करण्यात आली आहे.

तालुक्यातील दहीगाव येथील प्रति पंढरपूर मानले जाणारे श्री विठ्ठल रुक्माई मंदिराच्या दर्शनासाठी आषाढी एकादशी निमित्ताने हजारो भाविक दर्शनासाठी येतील त्यानिमित्ताने यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून दहा क्विंटल साबुदाणा फराळ वाटप होणार आहे. विविध संघटना केळी व चहा कॉफी वाटप करणार आहे.

गेल्या दीडशे वर्षाच्या परंपरेत येथील श्री विठ्ठल रुक्माई मंदिर याची ख्याती आहे दीडशे वर्षांपूर्वी येथे घनदाट जंगल होतं त्या जंगलात येथे मातीच्या घरामध्ये विठ्ठल रुक्माईची स्थापना गोसावी कुटुंबाने केली होती. तेव्हापासून श्री विठ्ठल रुक्माई ची पूजा आजच्या याच वंशाळेतले पुजारी करीत आहेत. सध्या हरिहर गोसावी महाराज हे आहेत 125 वर्षाच्या दीर्घ काळानंतर दहिगाव चे सुरेश देवराम पाटील यांनी या मंदिराची धुरा खांद्यावर घेऊन मंदिर भव्य उभारणीचा त्यांनी ध्यास घेतला आणि त्यांच्या सहकार्यांमार्फत कैलासवासी श्रीपत महाजन, प्रकाश सोनार, आत्माराम महाजन, रामदास पाटील, धांगो पाटील, हेमराज गंभीर महाजन यांचे मार्फत विविध ठिकाणी जाऊन लोक वर्गणी जमा करीत 25 लाख रुपये खर्च करून हे भव्य मंदिर उभारले.
यात प्रति पंढरपूर म्हणून सर्व देवतांचे छायाचित्र मुर्त्या बसवलेले आहेत म्हणूनच या मंदिराला प्रति मंडळ पंढरपूर म्हणून संबोधले जाते.

सन 1998 पासून येथे भव्य यात्रोत्सव साजरा केला जात आहे जिल्हाभरातून हजारो भाविक येथे दर्शनास येतात जिल्ह्यातून विविध ठिकाणी पायी दिंड्या सुद्धा येतात दिवसभर भावगीतांनी आणि भजन कीर्तन आणि गाव दुमदुमून निघते. गेल्या दोन वर्षाच्या काळात कोरोना असल्याने हा यात्रोत्सव बंद होता. मात्र यावर्षी आता तो खुला असल्याने यात्रा उत्सवात रंगत येणार आहे हजारो भाविक येथे येणार असून श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घेतील असे दिसून येत आहे. त्यानिमित्ताने सकाळी पाच वाजता विठ्ठल रुक्माई ची महापूजा करण्यात येईल.

ही पूजा नवदापत्यतर्फे करण्यात येणार आहे. यात स्वाती राहुल पाटील, अनिता आकाश बिजागरे, तनु राकेश धनगर, दुर्गा किरण पाटील, आरती ज्ञानेश्वर पाटील, ऐश्वर्या जगदीश पाटील, सारिका कुंभार, विकास कुंभार, शुभांगी सुनील माळी यांचे हस्ते ही पूजा करण्यात येणार असून शास्त्रोक्त पद्धतीने पूजन हरिहर गोसावी व प्रवीण कुलकर्णी महाराज हे करून घेणार आहेत. भाविकांनी या संधीचा लाभ घेऊन श्री विठ्ठल रुक्माई चे दर्शन घ्यावे. व महाप्रसादाचा लाभ घ्यावा. असे आवाहन श्री विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्टचे चेअरमन सुरेश देवराम व हरिभक्त परायण भजनी मंडळ दहिगाव यांनी केले आहे.

Protected Content