‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’च्या वृत्ताने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामाला प्रारंभ (व्हिडीओ)

e22ba7d6 3ff0 4a9e a93f da05ca4c441d

खामगाव, अमोल सराफ | ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’ने १९ जुलै रोजी मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत होणाऱ्या शेगाव ते गौलखेड या साडेचार किलोमीटर रस्त्याची बातमी प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत जिल्ह्यातील अधिकारी आणि कॉन्टॅक्टर यांनी या कामाला मुदत संपल्यानंतर आता सुरुवात केली आहे.

 

आता मात्र हे काम वैध आहे का ? असा प्रश्न येथे आजही निर्माण होतोय, कारण जे अधिकारी व ठेकेदार मागील एका वर्षात कामाला सुरुवात सुद्धा करू शकले नाही ते आता हे काम किती दिवसात थातूर-मातूरपणे पूर्ण करतील आणि त्या कामाचा दर्जा काय राहील ? हे बघणे महत्त्वाचे आहे. ज्या अधिकाऱ्यांना शासन भरगच्च पगार देते, ते अधिकारी त्यांचे काम योग्य रितीने का पार पाडत नाहीत, ज्या ठेकेदारांना ही कामे मिळतात, ते ठेकेदार आपली कामे वेळेच्या आत का पूर्ण करत नाहीत, हे चिंतेचे विषय आहेत. ‘लाईव्ह ट्रेंड न्यूज’ने आज ही सत्य परिस्थिती समोर आणली असून त्याची दखल शासनाने घेतली आहे. आता या रस्त्याचे काम अवैधरित्या का होईना पण सुरु झाले आहे. (कारण मुदत संपल्यानंतर होणाऱ्या कामाला अवैधच म्हणावे लागेल) जर का हे काम वैध असते तर मिळालेल्या मुदतवाढीचे फलक तेथे लागलेले दिसले असते.

 

 

Protected Content