फैजपूरच्या डॉ. नारखेडे यांचा गुजरात विधानसभेत सत्कार

faizpur news 2

फैजपूर प्रतिनिधी । गुजरात (वापी) येथील स्वामीनारायण फार्मसी महाविद्यालयाने सन 2008 पासून आजपर्यंत 100% निकालाची परंपरा कायम ठेवल्याने या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सचिन भास्कर नारखेडे (मूळ रा.फैजपूर) यांच्यासह संस्था पदाधिकारी व सहकारी प्राध्यापक यांचा गुजरातचे मुख्यमंत्री विजय रूपानी यांनी गुजरात विधानसभेत बोलावून विशेष सत्कार व गौरव केला.

प्राचार्य डॉ.सचिन नारखेडे व त्यांच्या महाविद्यालयाची विशेष दखल घेऊन महाविद्यालय विशेष दर्जा देण्याचे सुचोवात सुद्धा मुख्यमंत्री रूपानी यांनी केले. प्राचार्य नारखेडे हे मसाका संचालक नरेंद्र नारखेडे यांचे पुतणे आहे. तसेच लोकसेवक मधुकरराव चौधरी औषध निर्माण महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे त्यांच्या या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Protected Content