नवरात्रोत्सवात विठ्ठल मंदिर चौक व मेहरूण परिसरात बंदोबस्त ठेवा

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आगामी  नवरात्रोत्सवात विठ्ठल मंदिर चौक व मेहरूण परिसरात पोलिसांचा काटेकोर बंदोबस्त ठेवण्यात यावा अशी मागणी स्थानिक रहिवाश्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांना शुक्रवार २३ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.

 

विठ्ठल मंदिर चौकातील स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की. सोमवार २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सव साजरा करायला सुरुवात होणार आहे. या अनुषंगाने विठ्ठल मंदिर चौक व मेहरूण परिसरात देखील नवरात्रोत्सव धार्मिक पद्धतीने साजरा केला जाणार आहे. दरम्यान, यापूर्वी गणेश उत्सवाच्या विसर्जन मिरवणुकीत काही समाजकंटकांनी मुद्दामून धार्मिक वातावरण बिघडवून उत्सवाला गालबोट लावण्याचे काम करत आहे. अश्या घटनांमुळे परिसरातील वातावरण ढवळून व दूषित होऊन गुन्हे घडवण्याचे काम करत आहे. मागील गणपती विसर्जनाच्या दिवशी दंगली घडली होती. याचा विचार करून नवरात्रोत्सवात कोणताही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी विठ्ठल मंदिर चौक आणि मेहरूण परिसरात १० दिवस कडेकोट बंदोबस्त मिळावा जेणेकरून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येणार नाही, अशी मागणी यावेळी केली आहे. या निवेदनावर ॲड. नीता महाजन, मालती महाजन यांच्यासह विठ्ठल मंदिर चौक परिसरातील स्थानिक रहिवासी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content