Home Cities जळगाव भाजप मंडळ क्र. 3 च्या पुढाकाराने SIR मतदार पुनर्निरीक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजप मंडळ क्र. 3 च्या पुढाकाराने SIR मतदार पुनर्निरीक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
8

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । मतदार यादी अधिक अचूक, अद्ययावत आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या SIR (Special Intensive Revision)  मतदार पुनर्निरीक्षण कार्यक्रमांतर्गत भाजप मंडळ क्र. 3 च्या वतीने शिवकॉलनी येथे Enumeration Form (EF) भरणे व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून अनेक मतदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून Enumeration Form भरत मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविला.

दिनांक 15 जुलै रोजी आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला जळगाव शहराचे आमदार राजूमामा भोळे यांनी भेट देत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी प्रत्येक पात्र मतदाराने आपला Enumeration Form (EF) वेळेत भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित यंत्रणेकडे सादर करावा, असे आवाहन केले. मतदार यादीतील अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक नागरिकाचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

शिबिरादरम्यान मतदारांना फॉर्म भरण्याबाबत तसेच आवश्यक कागदपत्रांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्त्यांनी नागरिकांच्या शंकांचे निरसन करत फॉर्म भरण्यापासून ते नोंदणी प्रक्रियेपर्यंत सर्व प्रकारचे सहकार्य केले. त्यामुळे नागरिकांनीही मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग नोंदवत मतदार पुनर्निरीक्षण मोहिमेला सकारात्मक प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाला जळगाव विभागाचे प्रांत प्रमुख विनय गोसावी, BLA-1 शहर प्रमुख राहुल रमेश वाघ, भाजप मंडळ अध्यक्ष अजित राणे, नगरसेविका अंकिता पाटील, समाजसेवक पंकज पाटील, मंडळ सरचिटणीस चेतन तिवारी यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिरात सहभागी झालेल्या मतदारांनी मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम उपयुक्त ठरत असल्याची भावना व्यक्त केली. भविष्यातही अधिकाधिक नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होऊन आपले मतदार नोंदणीसंदर्भातील कामकाज वेळेत पूर्ण करावे, असे आवाहन आयोजकांनी केले. मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रियेत नागरिकांचा वाढता सहभाग आणि भाजप मंडळ क्र. 3 च्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा लोकशाही प्रक्रियेला बळकटी देणारा ठरला असून, आगामी काळातही अशा जनजागृतीपर उपक्रमांना नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 


Protected Content

Play sound