वैयक्तिक शौचालय योजनेत भ्रष्ट्राचारा संदर्भात पोलीस ॲक्शन मोडमध्ये

रावेर – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर पंचायत समितीच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचारा संदर्भात पोलीस प्रशासन अॅक्शन मोडमध्ये असून मुख्य सूत्रधार समाधान निंभोरेकडे याच्या चौकशीत यात अजून कोण जबाबदार आहे. हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे.

रावेर पंचायत समितीच्या ‘स्वच्छ भारत मिशन’ अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या मुळापर्यंत जाण्यासाठी पोलीस प्रशासनाचे तपासाचे चक्र आता शरण आलेला मुख्य सूत्रधार समाधान निंभोरेकडे वळवली आहे. त्याची कसून चौकशी सुरु असून यात अजून इतर कोण जबाबदार आहे. हे शोधण्याचा पोलीस प्रयत्न करीत आहे. या प्रकरणी आठ आरोपी अटकेत असून सर्वांना दि १२ पर्यंत पोलीस कोठडी आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्वाकांक्षी योजना असलेली स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय योजनामध्ये भ्रष्ट्राचार झाला आहे. यामुळे संपूर्ण जिल्हात खळबळ माजली आहे. रावेर तालुक्यातील सर्व शासकीय अधिकारी, राजकीय पदाधिकारी व माजी पंचायत समिती सदस्यांच्या नजरा पोलिसांच्या तपासाकडे आहे. मुख्य सूत्रधार आरोपी स्वता:हून गजाआड झाल्याने अनेकांना धडकी भरली आहेत.


तपास अधिकारी नाईक पुन्हा चर्चेत

रावेर दंगल शांत करण्यात महत्वाची भूमिका बजावणारे सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक वैयक्तिक शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याचे तपास अधिकारी आहे. अतिशय टेक्निकल आणि आर्थिक क्रिटीकल असलेल्या गुन्ह्याचा नाईक मॅक्रो पद्धतीने तपास करीत आहे. यापूर्वी त्यांनी नाशिकमध्ये गाजलेला रेशन घोटाळ्याच्या तपासात देखील महत्वाची भूमिका बजावली होती आणि आता शौचालय योजनेत झालेल्या भ्रष्ट्राचाराच्या तपासात नाईक पुन्हा चर्चेत आहे.

या प्रश्नाची उत्तरे जनतेला अपेक्षित

बेसलाईनची यादी टाळून मनमानी पध्दतीने अनुदान कोणाच्या आशीर्वादने दिले गेले…? शौचालय अनुदानाचा प्रस्ताव नसतांना लाभार्थीना अनुदान टाकलेच कसे..? दोन कंत्राटी कर्मचारी करोडोचे अनुदान वारेमाप पध्दतीने खर्च करत असतांना जबाबदार अधिकारी काय बघत होते..? लेखाधिका-यांनी स्वता:च्या कुटुंबाच्या खात्यावर अनुदान कोणाच्या आशिर्वादाने वर्ग केले..? शासनाच्या करोडो रुपयांचे भ्रष्ट्राचाराची जबाबदारी दोन कंत्राटी कर्मचा-यांवर निश्चत केली जाईल की यात अजून मोठ्या शासकीय व्यक्तीची एंट्री होईल..? या संपूर्ण वयक्तीक शौचालय योजनेच्या प्रकरणात कोणाचा निष्काळजीपणा कारणभुत आहे..? तालुक्यातील ती १२६ संशयित बँक खाती कोणाची..? भ्रष्ट्राचार योजना सुरळीत चालवण्यासाठी इतके वर्ष निंभोरेंना कोणाचे पाठबळ होत..? भ्रष्ट्राचाराचे पैसे निंभोरेंनी कोण-कोणाला दिले..? असे अनेक प्रश्न जनतेच्या मनात असून या सर्व प्रश्नाची उत्तरे येणाऱ्या चौकशीत मिळण्याची अपेक्ष आहे.

Protected Content