चारचाकी वाहनाच्या धडकेत प्रौढाचा जागीच मृत्यू

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रस्त्याने पायी जात असतांना चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत धरणगाव शहरातील परधीवाडा येथे ४४ वर्षीय प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता घडली होती.

याप्रकरणी मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनावरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. जितेंद्र हिलाल पारधी (वय-४४) रा. पारधीवाडा, धरणगाव असे मयताचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, धरणगाव शहरातील पारधीवाडा येथे जितेंद्र पारधी हे आपल्या परिवारासह वास्तव्याला होते. मजूरीचे काम करून आपला उदरनिर्वाह करत होते. २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास कामावरून घरी पायी जात असतांना मागून चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ ईए ५४४४) ने जोरदार धडक दिली.

या अपघातात जितेंद्र पारधी हे गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघात होताच चालक हा चारचाकी वाहन घेवून पसार झाला. याप्रकरणी मंगळवारी १० ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चारचाकीवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रामदास पावरा करीत आहे.

Protected Content