जळगावात तरूणाच्या हातातील मोबाईल दुचाकीवरील अज्ञात दोघांनी लांबविला

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहरातील रिंगरोड ते बहिणाबाई गार्डन परिसरात पायी जाणाऱ्या शाहू नगरातील तरूणाच्या हातातून ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या अज्ञात दोन जणांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, साहिन रफिक खाटीक (वय-२३) रा. शाहू नगर तरूण रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास रिंग रोडवरील बँक ऑफ इंडीया समोरून पायी जात होता. अचानकपणे मागून अज्ञात दोघेजण दुचाकीने येवून ८ हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबारी हिसकावून नेला. बहिणाबाई गार्डनच्या दिशेने पसार झाले. दोघांचा शोध घेतला परंतू दिसून आले नाही. साहिन याने तातडीने जिल्हा पेठ पोलीसात धाव घेतली. साहिन याच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बोरसे करीत आहे. 

Protected Content