पाचोरा येथे सेवालाल महाराजांची जयंती उत्साहात साजरी

 

पाचोरा, प्रतिनिधी  । येथील नवजीवन माध्यमिक विद्यालयात  सोमवार दि. १५ फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी सेवालाल महाराज यांची २८२ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. 

संत शिरोमणी सेवालाल महाराज जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक सिताराम पवार तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेंद्र राठोड, अशोक पवार, राजाराम राठोड, सेवानिवृत्त सहाय्यक फौजदार दिपचंद राठोड, अॅक्सीस बॅंकेचे कर्मचारी रविंद्र जाधव, नगरसेवक विकास पाटील उपस्थित होते. यावेळी समाज बांधवांनी सेवालाल महाराजांच्या प्रतिमेस माल्यापर्ण करुन त्यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकणारे मार्गदर्शन केले. कार्यक्रमास पंढरीनाथ राठोड, प्रेमसिंग राठोड, ज्ञानेश्वर राठोड, सोनु राठोड सह मोठ्या संख्येने समाज बांधव, महिला व विद्यार्थी – विद्यार्थीनी तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र राठोड तर  आभार अशोक जाधव यांनी मानले.

Protected Content