
फेकरी-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । फेकरी येथे महर्षी वाल्मिकी युवक संस्था आणि जयंती उत्सव समितीच्या संयुक्त विद्यमाने आद्यकवी महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच सामाजिक बांधिलकी जपत फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले.

महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध मान्यवर आणि संस्थेचे पदाधिकारी सहभागी झाले होते. जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षल सपकाळे, युवक वाल्मिकी संस्थेचे अध्यक्ष चेतन तायडे, सचिव किशोर सपकाळे, सहसचिव जयेश सपकाळे यांच्यासह मनोहर तायडे, किरण सपकाळे, अमृत सोनवणे, अशोक कांडेलकर, समाधान सपकाळे, संशोष माळी, वासुदेव तायडे, हितेश सपकाळे, हर्षल पवार आणि मिलिंद तायडे आदी उपस्थित होते. उपस्थितांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला अभिवादन करून जयंती साजरी केली. जयंतीचे औचित्य साधून महर्षी वाल्मिकी युवक संस्था आणि जयंती उत्सव समितीच्या वतीने फेकरी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांसाठी विशेष उपक्रम राबविण्यात आला. या वेळी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना शालेय साहित्याच्या भेटवस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यासाठी प्रोत्साहन मिळण्यास मदत झाली.
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यात आला. शिक्षणाला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होणे, या उद्देशाने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे उपस्थितांनी कौतुक केले. या कार्यक्रमाला शाळेचे शिक्षक चंद्रकांत सूर्यवंशी आणि आरिफ शेख, माजी उपसरपंच निलेश सोनवणे, जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष हर्षल सपकाळे, युवक वाल्मिकी संस्थेचे अध्यक्ष चेतन तायडे, सचिव किशोर सपकाळे, सहसचिव जयेश सपकाळे यांच्यासह मनोहर तायडे, निवृत्ती सपकाळे, अमृत सोनवणे, किरण सपकाळे, समाधान चिमनकर, हितेश सपकाळे, हर्षल पवार आणि मिलिंद तायडे आदी उपस्थित होते.



