Home धर्म-समाज श्री मोठे राम मंदिर संस्थानाच्या अधिकृत बोधचिन्हाचे उत्साहात अनावरण

श्री मोठे राम मंदिर संस्थानाच्या अधिकृत बोधचिन्हाचे उत्साहात अनावरण

0
4


पारोळा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  श्री मोठे राम मंदिर संस्थान, पारोळा यांच्या अधिकृत बोधचिन्हाचे अनावरण उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.  Namami270 यांच्या संकल्पनेतून आणि निर्मितीतून साकारलेल्या या बोधचिन्हात संस्थानाची समृद्ध धार्मिक परंपरा, प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि सूर्यवंशाचा गौरवशाली वारसा यांचे प्रतीकात्मक दर्शन घडविण्यात आले आहे.

 

या बोधचिन्हामध्ये गर्भमंदिराची प्रतीकात्मक रचना, प्रभू श्रीरामांच्या तिलकाचे चिन्ह, ‘ॐ’ अंकित भगवा धर्मध्वज, तेजस्वी सूर्य, कोविदार वृक्ष आणि विराजमान गोमातेची प्रतिमा यांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रत्येक प्रतीकातून भारतीय संस्कृती, धार्मिक श्रद्धा आणि परंपरेचे महत्त्व अधोरेखित होते. तसेच, बोधचिन्हावर ‘रामो विग्रहवान् धर्मः’ हे संस्कृत सुभाषित अंकित करण्यात आले आहे. या सुभाषितातून प्रभू श्रीरामांचे धर्मपालन, कर्तव्यनिष्ठा, सत्यनिष्ठा आणि आदर्श जीवनमूल्ये व्यक्त होतात.

श्री मोठे राम मंदिर संस्थानाची धार्मिक व सांस्कृतिक ओळख अधिक व्यापक करण्याच्या दृष्टीने हे बोधचिन्ह महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संस्थानाच्या विविध धार्मिक उपक्रमांमध्ये, पत्रकांमध्ये, निमंत्रणपत्रिकांमध्ये, कार्यक्रमांच्या फलकांवर तसेच डिजिटल माध्यमांमध्ये या बोधचिन्हाचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थानाचा गौरवशाली वारसा आणि धार्मिक परंपरा अधिक प्रभावीपणे भाविकांपर्यंत पोहोचविण्यास मदत होणार आहे.

या अनावरणप्रसंगी श्री मोठे राम मंदिर संस्थानाचे संचालक मंडळ तसेच विविध मान्यवर उपस्थित होते. नव्या बोधचिन्हाच्या माध्यमातून संस्थानाच्या श्रद्धा, परंपरा आणि सांस्कृतिक अस्मितेला एक स्वतंत्र व आकर्षक ओळख प्राप्त होणार असल्याची अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

मोठे राम मंदिर संस्थानाच्या अधिकृत बोधचिन्हामुळे पारोळ्यातील या धार्मिक स्थळाची ओळख अधिक व्यापक होण्यासोबतच प्रभू श्रीरामांचे आदर्श आणि भारतीय संस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यास हातभार लागणार आहे


Protected Content

Play sound