रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेशातील युवक जखमी

 

पाचोरा, प्रतिनिधी । प्रवाशी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेशातील युवक गंभीर जखमी झाल्याची घटना पाचोरा रेल्वेस्थानका नजीक काल घडली

 

या जखमी युवकावर जळगावच्या  गोदावरी हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. पुढील तपास ए. पी. आय. रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस. आय. ईश्वर बोरुडे, पो ना दिनेश पाटील हे करीत आहेत .

काल  सकाळी पाचोरा ते परधाडे दरम्यान गेट नं. १३२ जवळ प्रवासी रेल्वेतुन पडल्याने उत्तर प्रदेशातील युवक गंभीर झाला. जखमी अवस्थेत तो युवक गेट नंबर १३२ जवळ पोहचला त्याचे नाव अस्लम शेख हसन शेख ( रा. जनकपुर , उत्तर प्रदेश ) असे सांगून तो बेशुद्ध पडला.

 

आॅन ड्यूटी रेल्वे कर्मचाऱ्यांनी जखमी युवकास पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. अस्लम शेख याचेवर प्राथमिक उपचार करुन त्यास पुढील उपचारासाठी जळगांव येथील गोदावरी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. अस्लम शेख याचे जवळ कुठलाही पुरावा अथवा मोबाईल आढळुन न आल्याने त्याचे कुटुंबीयांचा शोध पाचोरा रेल्वे पोलिस ए. पी. आय. रमेश वावरे यांचे मार्गदर्शनाखाली ए. एस‌. आय. ईश्वर बोरुडे, पो ना दिनेश पाटील हे करत आहे. या  युवकाबाबत कोणासही काही माहिती असल्यास त्यांनी ९८२३५१३३५६ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन रेल्वे पोलिसांनी केले आहे.

Protected Content