
जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरूण परिसरातील सायलेन्सरला जोडणारा 35 हजार रूपये किंमतीचा पार्ट चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, सतिश हिरालाल लुंकड (वय-३०) रा. मेहरूण शिवार जळगाव हे व्यापारी आहेत. २५ जून रोजी सकाळी ११ ते २६ जून रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या वाहनाचा ३५ हजार रूपये किंमतीचा सायलेन्सरला जोडणारा पार्ट अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी सतिश लुंकड यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रदिप पाटील हे करीत आहे.


