Home Cities जळगाव पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात गणरायाचे आगमन

पारंपरिक वाद्यांच्या गजरात डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद महाविद्यालयात गणरायाचे आगमन

0
82

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । गोदावरी फाउंडेशन संचालित डॉ. गुणवंतराव सरोदे आयुर्वेद मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे १४ सप्टेंबर रोजी भक्तिमय वातावरणात गणरायाचे आगमन झाले.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. ढोल-ताशांच्या निनादात महाविद्यालय परिसरात गणरायाचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यानंतर महाविद्यालयाचे डीन डॉ. हर्षल बोरोले यांनी सपत्नीक विधिवत पूजा-अर्चा करून गणरायाची स्थापना केली.
यावेळी विद्यार्थी, शिक्षक व नॉन-टीचिंग स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होता. गणरायाची आरती करून सर्वांच्या सुख-समृद्धीसह महाविद्यालयाच्या प्रगतीसाठी प्रार्थना करण्यात आली. विद्यार्थ्यांसह कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्त सहभाग घेत गणेशोत्सवाचा आनंद साजरा केला.

Protected Content

Play sound