इस्त्राएलने मराठीतून ट्विट करत राज्य सरकारचे मानले आभार !

मुंबई प्रतिनिधी । समुद्राचे पाणी गोड करण्याबाबत महाराष्ट्राने एका कंपनीसोबत करार केला असून यानंतर इस्त्राएल या देशाने मराठीतून ट्विट करत राज्य सरकारचे आभार मानले आहेत.

मुंबई पालिका व आय.डी.ई. वॉटर टेक्नॉलॉजीज लि. दरम्यान मालाड, मनोरी येथील दोनशे दशलक्ष लिटर नि:क्षारीकरण प्रकल्पाचा अहवाल तयार करण्याचा सामंजस्य करार सोमवारी करण्यात आला. 

इस्रायलच्या मुंबईतील दूतावासानंही याची दखल घेत खास मराठीत ट्विट करत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन केलं आहे. “मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पाण्याचे, पर्यावरणाचे आणि वेळेचे महत्व ओळखून मुंबईला नि:क्षारीकरणाद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकल्याबद्दल आपले अभिनंदन. जल तंत्रज्ञानात आघाडीवर असलेला इस्रायल या वाटचालीत महाराष्ट्राच्यासोबत आहे”, असं ट्विट इस्रायलच्या मुंबईतील दूतावासाकडून करण्यात आलं आहे.

हा प्रकल्प  एक क्रांतिकारी पाऊल असून आज  अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. हा प्रकल्प  एक क्रांतिकारी पाऊल असून आज  अनेक वर्षांच्या स्वप्नाला मूर्त रूप येत असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री ठाकरे यांनी यावेळी केले.

 

Protected Content