अ‍ॅक्सिस बँकेत खाती वळवल्या प्रकरणी फडणवीसांना कोर्टाची नोटीस

नागपूर: मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करत महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत येणार्‍या पोलिस कर्मचार्‍यांची बँक खाती राष्ट्रीय बँकांमधून अ‍ॅक्सिस बँकेत वळवल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी नागपूर खंडपीठाने फडणवीस यांच्यासह मुख्य सचिव, गृह विभाग आणि पोलिस महासंचालकांना नोटीस बजावली आहे.

याबाबत वृत्त असे की, देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात राज्याच्या मुख्य सचिवांनी परिपत्रक काढून सरकारी कर्मचार्‍यांची एसबीआय व इतर राष्ट्रीयीकृत बँकांमधील खाती अ‍ॅक्सिस बँकेत वळती करण्याचा आदेश दिला होता, असा आरोप करणारी फौजदारी जनहित याचिका मोहनीश जबलापुरे यांनी हायकोर्टात दाखल केली आहे. याप्रकरणी न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे ऐकून घेत गुरुवारी फडणवीस यांच्यासह अन्य तीन प्रतिवादींना नोटीस बजावत आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचा आदेश दिला. याचिकाकर्त्यातर्फे अ‍ॅड. सतीश उके यांनी बाजू मांडली.

Protected Content