आगामी निवडणूक शिवसेनेसोबत लढणार का ? : निरुपम यांचा काँग्रेसला सवाल

sanjay nirupam

मुंबई, वृत्तसंस्था | महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सकारात्मक संकेत मिळाले असून काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मात्र थेट नाराजी व्यक्त केली आहे. राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही अशी भीती संजय निरुपम यांनी व्यक्त केली आहे. राज्यात लवकरच पुन्हा एकदा निवडणूक होईल, अशी शक्यताही त्यांनी व्यक्त केली आहे. भविष्यात शिवसेनेसोबत निवडणूक लढणार का ? असा सवाल त्यांनी आपल्याच पक्षाला विचारला आहे.

 

“सरकार कोण आणि कसे स्थापन करतंय हा प्रश्न महत्त्वाच नाही, तर राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण होईल ही शक्यता कोणीच नाकारु शकत नाही. राज्यात नव्याने होणाऱ्या निवडणुकांसाठी तयार राहा. कदाचित २०२० मध्ये पुन्हा निवडणूक होईल. मग आपण त्यावेळी शिवसेनेसोबत मित्रपक्ष म्हणून निवडणूक लढणार आहोत का ?,” असा सवाल संजय निरुपम यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला आहे.

या आधीही संजय निरुपम यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करणे धोक्याचे पाऊल असल्याचे सांगत चेतावणी देण्याचा प्रयत्न केला होता. त्याच बरोबर काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांनी जर शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आमचे समर्थन हवे असेल तर भाजपापासून विभक्त व्हावे लागले असे म्हटले होते. दुसरीकडे मल्लिकार्जून खरगे आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र शिवसेनेसोबत जाण्यावर आक्षेप नोंदवला आहे. दोन्ही पक्षांची विचारसरणी पूर्णपणे वेगळी असून, दोन्ही पक्ष एकत्र येण्याचा प्रश्नच नाही असे शिंदे यांनी म्हटले आहे.

Protected Content