प. वि. पाटील व ए. टी. झांबरे विद्यालयात राष्ट्रीय शिक्षण दिन उत्साहात

p.v.patil school

 

जळगाव प्रतिनिधी । शहरातील केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि. पाटील विद्यालय आणि ए.टी. झांबरे माध्यमिक विद्यालय यांच्या संयुक्त विद्यामानाने भारत देशाचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांचा वाढदिवस राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सर्वप्रथम मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते मौलाना आझाद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. याप्रसंगी ‘शिक्षणाने आम्हाला काय दिले ?’ या विषयावर चैतन्य बडगुजर, दामोदर चौधरी, तेजस कोळी, युर्वेश पाटील, शिवानी नाईक आदी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपशिक्षक वेदप्रकाश गडदे व पराग राणे यांनी मौलाना आझाद यांचे शिक्षणाविषयीचे विचार व्यक्त केले. कार्यक्रमात प्राचार्य डी.व्ही.चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे यांची विशेष उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश भालेराव, डी.ए.पाटील, सुनील बावस्कर, सतिष भोळे, वंदना मोरे, रोहिणी चौधरी, चंद्रकांत कोळी आदींनी अथक परिश्रम घेतले.

Protected Content