नुतन मराठा प्रकरण: निमखेडी शिवारात भोईटेंच्या घरावर दगडफेक; तीन जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी ।  नुतन मराठा संस्थेच्या गैरप्रकरणाबाबत केलेल्या तक्रारी व आक्षेप मागे घ्यावी अन्यथा जीवेठार मारण्याची धमकी देत जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केल्याची घटना निमखेडी शिवारातील विठ्ठल पार्क येथे घडली. याप्रकरणी तालुका पोलीसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयवंत बाबुराव भोईटे (वय-३७) रा. विठ्ठल पार्क निमखेडी शिवार जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह राहतात. शहरातील जळगाव जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेत संचालक या पदावर कार्यरत आहे. या संस्थेत निलेश रणजित भोईटे हे मानद सचिव म्हणून कार्यरत आहे. संस्थेत होत असलेल्या गैरप्रकाराबाबत जयवंत भाईटे यांनी न्यायालयात तक्रारी केलेल्या. निलेश भोईटे यांनी जळगाव मराठा संस्थेच्या विविध मागण्यांसाठी नाशिक धर्मदाय आयुक्तांकडे अर्ज दाखल केला आहे. यावर जयवंत भोईटे यांनी आक्षेप घेतला आहे. यावरून निलेश भोईटे यांच्यावर घेतलेला आक्षेप जयवंत भोईटे यांनी मागे घ्यावा यासाठी अनेक दिवसांपासून दबावतंत्र सुरू आहे. दरम्यान गुरूवारी १५ जुलै रोजी रात्री १० वाजता जयवंत भोईट आपल्या कुटुंबियासोबत घरात असतांना संशयित आरोपी  कल्पेश संभाजी भोईटे, प्रशांत विलास भोईटे आणि हेमंत जयवंत येवले सर्व रा. जळगाव यांनी अचानकपणे जयवंत भोईटे यांच्या घरावर दगडफेक केली. यातील योतील कल्पेशने शिवीगाळ करून म्हणाला की, निलेश भाऊने तुला शेवटची ताकीद दिली आहे. जर तू आमच्या विरोधात केलेले अर्जफाटे बंद किंवा मागे घेतले नाही तर तुला जीवे ठार मारीन अशी धमकी दिली. जयवंत भाईटे यांचे भाऊ ललित भोईटे यांना देखील धमकी दिली. जयवंत भोईटे यांनी तालुका पोलीसात तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून तिघांवर गुरूवारी रात्री ११ वाजता तालुका पोलीसात गुन्हा दाखल  करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल हिरालाल पाटील करीत आहे. 

Protected Content