बेकायदेशीर घरावर कब्जा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल

जळगाव प्रतिनिधी । रामानंद नगरातील गिरणाटाकी परिसरात एका व्यापाऱ्याच्या मालकीच्या घरात अनधिकृतपणे राहणाऱ्या तीन जणांवर काल बुधवारी दुपारी ४ वाजेच्या सुमारास रामानंद नगर पोलीस ठाण्यात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रामानंद नगर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, सुर्यकांत मदनराव विधाते (वय-६६) रा. कलेक्टर बंगल्याजवळ शिवराम नगर हे व्यापारी असून आपल्या कुटुंबियांसह राहतात. रामानंद नगर परिसरातील गिरणा टाकीजवळील गट नंबर ४८४/५ मधील फ्लॅट नंर ७ हा सुर्यकांत विधाते यांचा मालकीचा आहे. मागील भांडणाच्या कारणावरून संशयित आरोपी शैलेस जमदास भाटीया रा. गिरणा टाकी,  सुजाता श्रीकांत विधाते व प्रणव श्रीकांत विधाते दोन्ही रा. चैत्रबन कॉलनी  यांनी २ जुन पासून ते आजपर्यंत सुर्यकांत विधाते यांच्या गिरणाटाकी परिसरातील फ्लॅटमध्ये बेकायदेशीर व अनधिकृपणे राहत आहे. फ्लॅट खाली करण्याचे सांगितले असता तिघांनी शिवीगाळ करून धमकी दिली. याप्रकरणी सुर्यकांत विधाते यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात शैलेंश भाटीया, प्रवण विधाते आणि सुजाता विधाते यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विनोद सोनवणे करीत आहे. 

Protected Content