दुचाकी अपघातात जखमी झालेल्या वृध्दाचा मृत्यू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसुंबा गावाजवळ दुचाकीच्या झालेल्या अपघतात जखमी झालेल्या चिंचोली गावातील ६५ वर्षीय वृध्दाचा बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अशोक आनंदा घुगे (वय-६५) रा. चिंचोली ता. जि.जळगाव असे मृत वृध्दाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील चिंचोली येथील अशोक घुगे हे आपल्या पत्नी व मुलासह वास्तव्याला होते. ते ग्रामपंचायत कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई कर्मचारी आहेत. मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी अशोक घुगे हे जळगाव शहरात कामानिमित्ताने दुचाकीने आले होते. काम आटपून ते जळगावहून चिंचोली येथे जाण्यासाठी निघाले असता रस्त्यावरील कुसुंबा गावाजवळ भरधाव येणाऱ्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले, त्यांना स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. बुधवारी १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस नोंद करण्यात आली आहे. मयताच्या पश्चात पत्नी मुलगा आणि विवाहित मुलगी असा परिवार आहे.

Protected Content