बसस्थानक आवारातून महिलेची पर्स लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानक परिसरात महिलेची पर्ससह मोबाईल व २१ हजाराची रोकड असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, स्वाती प्रमोद पाटील (वय-५५) रा.पिंपळगाव हरेश्वर ता.पाचोरा ह.मु. गुलमोहर कॉलनी जळगाव या महिलाच आपल्या परिसरात परिवारासह वास्तव्याला आहेत. मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजता त्या जळगाव शहरातील नवीन बसस्थानक येथे आल्या. अज्ञात चोरट्याने त्यांची पर्स लांबवली, त्या पर्समध्ये २१ हजार रुपयाची रोकड आणि ५ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून सायंकाळी ६ वाजता अज्ञात चोरट्यांवर जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ फिरोज तडवी करीत आहे.

Protected Content