युवासेनेचा झंझावात असाच सुरू ठेवा -निलेश महाले

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरामध्ये युवा सेनेने संघटन अजून मजबूत केले पाहिजे. संपूर्ण शहरासह जिल्हा व राज्य आपल्याकडे आशेने बघत आहे. लवकरात लवकर नियुक्त जाहीर करून कार्यकारणी पूर्ण करा आणि युवा सेनेचा दबदबा संपूर्ण शहरात आहे त्यापेक्षा अजून मोठ्या प्रमाणावर होऊ द्या. असे आदेश युवासेना कार्यकारणी सदस्य निलेश महाले यांनी जळगाव शहरातील युवा सैनिकांना दिले.

 

यावेळी ते म्हणाले की, युवासेना ही युवकांसाठी काम करणारी महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाची संघटना आहे. यामुळे संपूर्ण युवावर्ग आपल्याकडे आशेने पाहत असून युवकांचे प्रश्न अधिक तागतीने कसे मांडता येतील याकडे लक्ष द्या.असे आदेश युवासेना कार्यकारणी सदस्य निलेश महाले

याचबरोबर, युवावर्ग आपल्याकडे बघतोय सर्वसामान्य वर्ग महिला वर्ग आपल्याकडे बघतोय. त्यांना आपण एक आशा वाटत आहोत. या सगळ्यांचे प्रश्न मांडत युवा सेनेचे काम अगदी जोरात सुरू केले पाहिजे.

 

युवा सेना कार्यकारणी सदस्य निलेश महाले हे जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. यावेळी त्यांनी जळगाव शहरातील युवा सैनिकांची संवाद साधला व युवा सेनेला कशाप्रकारे पुढे घेऊन जायचं आणि सुरू असलेलं काम कशाप्रकारे अजून जोरात करायचं याबाबत मार्गदर्शन केले.

 

यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून युवासेना कोरकमिटी सदस्य श्री. निलेशजी महाले यांच्या समवेत शिवसेना जिल्हाप्रमुख  विष्णू भंगाळे  महानगर प्रमुख शरद  तायडे विभागीय सचिव विराज कावडिया विस्तारक चैतन्य जी बनसोडे शिवसेना महिला आघाडी महानगर प्रमुख गायत्री सोनवणे, युवासेना जिल्हा अधिकारी पियुष गांधी, उपजिल्हाधिकारी विशाल वाणी,  समन्वयक जितेंद्र बारी, जिल्हा चिटणीस, अंकित कासार महानगर अधिकारी अमोल मोरे, यश सपकाळे,आदी उपस्थित होते.

 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहर अधिकारी गिरीश कोल्हे, विनोद गायकवाड, गजेंद्र कोळी, उपमहानगर अधिकारी मयूर गवळी, महेश पाटील, निशिकांत पाटील, संस्कार मोहिते, देवा पाटील, अजिक्य कोळीविभाग अधिकारी संजय बाविस्कर, गौरव चंदनकर, तुषार पाटील यांनी सहकार्य केले या वेळी झैद तैयप पटेल या युवकाने असंख्य कार्यकत्या न सह युवासेनेत पक्ष प्रवेश केला, संस्कृती संघपाल तायडे, या युवतीने प्रवेश केला  काही पदाधिकाऱ्यांना यावेळी नियुक्ती पत्र देण्यात आले जय मेहता जिल्हा सरचिटणीस, निलेश जोशी उपमहानगर अधिकारी, झैद पटेल आदींचा यात समावेश आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  महानगर समन्वयक महेश ठाकूर यांनी प्रास्ताविक पियूष गांधी यांनी तर आभार अमित जगताप यांनी मानले.

Protected Content