शिंदाड येथे स्वातंत्र्यंदिनी ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार

 

पाचोरा, प्रतिनिधी  । शिंदाड येथे  स्वातंत्र्यंदिनाच्या ७५ वर्षानिमित्त गावातील ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार ग्रामपंचायतच्यावतीने करण्यात आला.

गावातील ७५ वर्ष व त्यावरील वयाच्या  १०० जेष्ठ नागरिकांना भगवे फेटे घालून श्रीफळ, रुमाल, गुलाबपुष्प देऊन पिंपळगाव – शिंदाड जि. प. गटाचे सदस्य मधुकर काटे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील व सदस्यांनी  सत्कार केला.

 

ग्रामपंचायत आवारात सरपंच ज्ञानेश्वर तांबे यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शाहीर मार्तंड जवरे यांनी पोवाडा सादर केला. त्यानंतर ७५ वर्षांवरील १०० नागरिकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मधुकर काटे, नरेंद्र पाटील, सतीश पाटील, प्रतिभा चौधरी, सदाशिव पाटील, रामभाऊ कुंभार, प्रदीप बोरसे यांनी मनोगत व्यक्त केले.

 

सर्व वयोवृद्ध नागरिक एकाच ठिकाणी जमल्याने त्यांचे मन भारावून गेले व गप्पा रंगल्या त्यांनी ह्या अनोखा उपक्रमाचे व ग्रामपंचायतीचे कौतुक केले.  डिगंबर पाटील , ग्रा. पं. सदस्य संदिप सराफ, विलास पाटील, स्वप्नील पाटील, अकिल तडवी, समाधान पाटील, उज्वला पाटील, कांताबाई पाटील, ठगुबाई धनगर, जनाबाई पाटील, मीराबाई परदेशी, नजमाबाई तडवी, कांचन परदेशी, धनराज पाटील, इंदल परदेशी, बापू मुट्ठे, राजेंद्र परदेशी, विनोद तडवी, तलाठी गणेश मगावकर, बालू श्रावणे, पोलीस पाटील ऐश्वर्या पाटील, दत्तू पाटील, कृष्णा धनगर, दशरथ पाटील, शांताराम बोरसे, प्रदीप धनगर, नारायण पाटील,  संजय पाटील, प्रल्हाद शिंपी, रवींद्र पाटील, अमोल व्यवहारे , संदीप बोरसे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन बालू श्रावणे, प्रास्ताविक नरेंद्र पाटील यानी केले  तर आभार संदिप सराफ यांनी मानले.

 

Protected Content