तळेगावच्या आश्रमशाळेत ११ वर्षांनंतर स्वातंत्र्यदिन साजरा

 

चाळीसगाव: प्रतिनिधी ।  तळेगाव तांडा येथील प्रबोधनकार ठाकरे आश्रमशाळा प्रदिर्घ काळानंतर परत मिळाल्याने ११ वर्षांनंतर  75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते .

 

 

चाळीसगाव तालुक्यातील दिनदुबळ्यांना शिक्षण घेता यावे या भावनेतून  प्राणीमित्र इंदल चव्हाण यांच्या परिश्रमातून सन 1986 मध्ये  प्रबोधनकार ठाकरे आश्रम शाळा  तळेगाव तांडा (कृष्णनगर) येथे स्थापन करण्यात आली. १५ वर्ष विनाअनुदानित तत्त्वावर शाळा चालवून सन १९९९ साली मान्यता देण्यात आली. परंतु राजकीय कटकारस्थाने वाढल्याने कालांतराने मान्यता  काढून घेण्यात आली होती

 

दरम्यान प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी २५ वर्ष न्यायालयीन लढाई लढून नुकतीच ती संस्था परत मिळवली आहे. त्यामुळे ११ वर्षांनंतर प्रथमच या संस्थेत 75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

 

यावेळी भारत माता,  संत दगडूजी महाराज, प्रबोधनकार ठाकरे , संत सेवालाल महाराज, छत्रपती शिवाजी महाराज ,बाबासाहेब आंबेडकर,  स्व. शिवसेना प्रमुख  बाळासाहेब ठाकरे, क्रांतिकारी  भगतसिंग ,राजगुरू सुखदेव  यांच्या  प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. ध्वजारोहण जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ माऊली यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी मनोगतात, आर्थिक दृष्ट्या कमकुवत व शिक्षणापासून वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून शिक्षणाची खरी ज्योत पेटवणार असल्याचे प्रतिपादन केले.  मुख्यमंत्री उध्व ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नव्याने प्राथमिक आश्रम शाळेची मान्यता दिल्याने प्राणीमित्र इंदल चव्हाण यांनी आभार मानले. मान्यता मिळवून देण्यासाठी अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष अभ्यंकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

 

या प्रसंगी काशिनाथ  माउली, देवेंद्र डि. नायक , ॲड. भरत चव्हाण व भिमराव जाधव यांनी  मनोगतातून प्राणीमित्र ईंदल चव्हाण यांच्याबद्दल सांगून भविष्यात आश्रम शाळा महाराष्ट्रातील आदर्श शाळा म्हणून नावरूपाला येवो अशा सदिच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी बंजारा एकीकरण समितीचे प्रमुख देवेंद्र डी. नायक, कांतिलाल राठोड ,चत्रू रूपसिंग राठोड, चिंतामण चव्हाण, माजी उपसरंपंच गोर्धन राठोड (तळेगाव), शिवसेना उपतालुका प्रमुख अनिल राठोड, शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, सचिव भिमराव जाधव, पत्रकार योगेश्वर राठोड,  रूपसिंग जाधव , सरदार राठोड ,प्रभू चव्हाण , भास्कर चव्हाण, आरूण चव्हाण, मोतीलाल चव्हाण, रावसाहेब चव्हाण, भुरसिंग ट्रेलर, ज्ञानेश्वर चव्हाण, छगन चव्हाण ( बंजारा शाहीर, कवी, ) ईश्वर राठोड , बाळू चव्हाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी अवी चव्हाण ,श्माम चव्हाण , कल्याण चव्हाण  विनोद जाधव आदींनी परीश्रम घेतले.  प्रास्ताविक भिमराव जाधव यांनी केले तर आभार गोर्धन राठोड यांनी मानले.

 

Protected Content