जळगाव ते जालना रेल्वेमार्गाचे उदघाटन लवकरच : दानवे

जालना-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | जळगाव ते जालना रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या कामाच्या निविदा प्रसिद्धा झाल्या असून या रेल्वेमार्गाचं आपण लवकरच उदघाटन करणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिली आहे.

जालना येथे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड अँग्रीकल्चरच्या वतीने ’केंद्रीय अर्थसंकल्प-महाराष्ट्राच्या व्यापार, उद्योग, कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय मिळणार’ या विषयावर चर्चासत्राचं आयोजन करण्यात आले. यात बोलतांना रावसाहेब दानवे यांनी रेल्वेच्या माध्यमातून कनेक्टीव्हिटी वाढणार असल्याचे प्रतिपादन केले.

या संदर्भात ना. दानवे म्हणाले की, जालना ते जळगाव रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणाच्या कामाच्या निविदा प्रसिद्धा झाल्या आहेत. या रेल्वेमार्गाचं सहा महिन्यात सर्वेक्षण पूर्ण होईल होऊन या रेल्वे मार्गाचं उद्घाटन करणार असल्याचंही दानवे यांनी म्हटलं आहे. शिवाय मराठवाड्यातील नांदेड ते मनमाड या रेल्वेमार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ येत्या १२ मार्च रोजी करणार असल्यचे ना. रावसाहेब दानवे म्हणाले.

दरम्यान, या कार्यक्रमात दानवे यांनी राज्य सरकारच्या कामावर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, तीन वर्षांत महाविकास आघाडी सरकारने काहीच कामं केली नसून फक्त काही लाखांच्या निधीवरच रस्त्यांची बोळवण सुरू असल्याची टीका केली.

Protected Content