के. सी. ई च्या पी. जी. महाविद्यालयात प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च स्कीम पुस्तकाचे प्रकाशन

जळगाव, प्रतिनिधी । के.सी. ई. सोसायटीचे, पोस्ट ग्रॅज्युएट कॉलेज ऑफ सायन्स टेक्नॉलॉजी आणि रिसर्च, या महाविद्यलयात प्रोस्पेक्टिव्ह रिसर्च  स्कीम या पुस्तकाचे प्रकाशन स्कूल ऑफ लाईफ सायन्स क. बा. चौ. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठचे प्रोफेसर व्ही. एल. माहेश्वरी  यांच्या हस्ते करण्यात आले. 

 

आज शुक्रवार दि.  २०  ऑगस्ट रोजी पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष डॉ. हर्षवर्धन जावळे व प्रमुख पाहुणे डॉ. व्ही .एल. माहेश्वरी, प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे, पुस्तकाचे प्रमुख संपादक प्राध्यापक संदीप पाटील आणि पी आर एस चे कॉर्डिनेटर प्राध्यापक जावेद खान यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पालन करून पार पाडण्यात आला. यावेळी विद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. एकता जगन्नाथ फुसे बायोटेक्नॉलॉजी विभाग व ललित कुमार दिलीप पाटील ऑरगॅनिक केमिस्ट्री या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ गुणवत्ता यादीत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या विद्यार्थ्यांचा विद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. झोपे यांनी सत्कार व कौतुक केले. यासोबत प्राध्यापक रवींद्र पाटील यांचे डॉक्टरेट डिग्री मिळवल्याबद्दल व उल्हास पाटील यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक व स्टॅटिस्टिक्स या विभागातील प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. जी डी बेंडाळे स्कॉलरशिप वितरित करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक संदीप पाटील यांनी केले यावेळेस त्यांनी पी आर एस स्कीम बद्दल माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात डॉक्टर जावळे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना भावी जीवनाबद्दल शुभेच्छा दिल्या. प्राध्यापक रवींद्र पाटील यांनी पाहुण्यांचे आभार व्यक्त केले. सदर कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Protected Content