लोकशाही बचाव संघर्ष समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

e42cff55 8f06 440e 93bb 490693cc8000

जळगाव, प्रतिनिधी | सार्वत्रिक निवडणुकांमध्ये इलेक्ट्रॉनिक वोटींग मशिन (ईव्हीएम) वापरून मोठ्या प्रमाणावर हेराफेरी होत आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा आणि त्यांच्या आघाडीने ईव्हीएममध्ये घोटाळे करून पाशवी बहुमत प्राप्त केले आहे. यामुळे मतदारांचे मताधिकाराचे मुल्य शून्य झाले असून प्रौढ मताचा अधिकार धोक्यात आल्याने संसदीय लोकशाही संकटात सापडली आहे. यासाठी ईव्हीम द्वारा होणारी निवडणूक प्रक्रिया बंद करून आगामी विधानसभा निवडणूका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या आशयाची मागणी घेवून जळगाव जिल्हा ‘लोकशाही बचाव संघर्ष समिती’च्या वतीने आज (४ जुलै) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली.

 

लोकशाही बचाव संघर्ष समितीचे प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे, सहसंयोजक बाबुराव वाघ, भारत ससाणे, संजय जमादार, अशफाक पिंजारी, फईम पटेल, संजय सपकाळे, विवेक ठाकरे, लिलाधर तायडे, गमीर शेख, डॉ.धर्मेश पालवे, अरविंद मानकरी, अमोल कोल्हे, अनिल नाटेकर, माजी नगरसेवक राजू मोरे आदींच्या नेतृत्वात ही निदर्शने झाल्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी वामनराव कदम, यांना निवेदन सादर करण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढारलेल्या जर्मनी, ऑस्टेलिया, अमेरिका तसेच इतर विकसित राष्ट्रांनी ईव्हीएम मशिन नाकारले असतांना भारतात ईव्हीएमद्वारा मतदान प्रक्रिया राबवण्याचा घाट हा लोकशाही संपुष्टात आणणारा आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालात मोजणी करतांना झालेल्या मतदानापेक्षा प्रत्येक ठिकाणी जास्त मतदान आढळून आल्याची बाब स्पष्ट झालेली आहे. ईव्हीएम वापरून घोटाळ्याची ही विसंगत कृती बंद झाली पाहिजे. याचा गांभीर्याने विचार न केल्यास मतदार लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरून जनआंदोलन करतील असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

निदर्शनात खुशाल चव्हाण, चंदन बिर्‍हाडे, प्रा.प्रितीलाल पवार, हरिशचंद्र सोनवणे, समाधान सोनवणे, नाना मगरे, नगरसेवक राजू मोरे, सचिन अडकमोल, किरण वाघ, जयपाल धरंधर, फकीरा अडकमोल, प्रा.चंद्रमणी लभाणे, प्रा.शांताराम भोई, दिलीप सपकाळे, आनंदा तायडे, गौतम सपकाळे, चंद्रकांत नन्नवरे, उत्तम भालेराव, विशाल अहिरे, विश्वास बिर्‍हाडे, किरण नन्नवरे, पितांबर अहिरे, रविंद्र भालेराव, विजय करंदीकर, राष्ट्रपाल धुरंधर, यशवंत घोडेस्वार, संजय बागूल, रफीक पिंजारी, भारत सोनवणे, अनुप पानपाटील, सुजित शिंदे, अब्बास खाटीक, सुनिल पाटील, अंजुम रजवी, बबलु सोनवणे, राहित भालेराव, गोकुळ बडगुजर, उत्तम सपकाळे, गुरूनाथ सैंदाणे आदींनी सहभाग घेतला.

१६ जुलै रोजी एकदिवसीय धरणे आंदोलन:- राज्य विधानसभेच्या निवडणुकीत ईव्हीएम न वापरता बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या १६ जुलै रोजी सकाळी ११.०० ते दुपारी २.०० वाजेदरम्यान एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. लोकशाही बचाव संघर्ष समितीच्या या आंदोलनात आपला मतदानाचा हक्क अबाधीत रहावा व लोकशाही वाचवण्यासाठी जास्तीत जास्त संघटना व संविधानप्रेमी नागरिक बंधू-भगिनींनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन प्रमुख संयोजक मुकुंद सपकाळे यांनी केले आहे.

Protected Content