पोलिसांनी पकडले अवैधरित्या गुरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोदावरी इंजिनिअरींग कॉलेज समोरून अवैधरित्या गुरांची कोंबून कत्तलीसाठी वाहतूक करणारे वाहन पकडण्यात आले. यात कारवाईत गुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी आज दुपारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, “शहरातील गोदवरी इंजिनिअरींग कॉलेजजवळ एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास गस्तीवर असतांना पिकअप व्हॅन (एमएच २० ईजी १६९१)  मध्ये गुरांना निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असतांना आढळून आले. गुरांची वाहतूकीचा परवाना विचारले असता चालक शकील अहमद मसुद्दीन (वय-३२) रा. मेहरूण पिरजादे जळगाव याने उडवाउडवीची उत्तरे दिली.

पोलीसांनी वाहन एमआयडीसी पोलीस ठाण्यात आणून गुरांची सुटका करण्यात आली. सहाय्यक फौजदार वामन महाजन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आज, शनिवार, दि. ९ जुलै रोजी दुपारी वाहन चालक शकील अहमद मसुद्दीन यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.” पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Protected Content