रावेरचे काँग्रेस पदाधिकारी राष्ट्रवादीत दाखल

रावेर प्रतिनिधी । परिवार संवाद यात्रेत काँग्रेसचे रावेर शहराध्यक्ष डॉ. शब्बीर शेख यांच्यासह निसार हाजी कुरेशी व पंकज वाघ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे माजी आमदार अरूणदादा पाटील यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून प्रदेशध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते रावेर Raver कॉग्रेसचे शहराध्यक्ष डॉ शब्बीर शेख निसार हाजी कुरेशी आणि पंकज वाघ या पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश घेतला आहे. यावेळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष निळकंठ चौधरी, शहराध्यक्ष महेमुद शेख, राष्ट्रवादी युवक तालूकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनिल कोंडे, सोपान पाटील, गोटू शेट, अल्पसंख्य तालुकाध्यक्ष इमरान पहेलवान आदींची उपस्थिती होती.

या तिन्ही मान्यवरांचे ना. जयंत पाटील यांनी स्वागत केले. याप्रसंगी माजी मंत्री एकनाथराव खडसे, माजी आमदार अरूण पाटील, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित होते.

Protected Content