राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. संजीव पाटील

जळगाव Jalgaon प्रतिनिधी । अलीकडेच राष्ट्रवादीत दाखल झालेले डॉ. संजीव पाटील यांची पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

माजी मंत्री एकनाथराव खडसे eknathrao khadse यांच्या सोबत भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. संजीव पाटील dr. sanjiv patil हे देखील राष्ट्रवादीत दाखल झाले होते. या अनुषंगाने आता त्यांना कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्ष म्हणून स्थान देण्यात आले आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन मजबूत करण्याचा मानस डॉ. संजीव पाटील यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नियुक्तीचे माजी मंत्री एकनाथराव खडसे, गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील व महानगराध्यक्ष अभिषेक पाटील यांच्यासह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी स्वागत केले आहे.

Protected Content