बस व ट्रकच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू

हैदराबाद वृत्तसंस्था । आंध्रप्रदेशातील वेलदुर्ती शहराजवळ बस व ट्रकच्या धडकेत १३ जणांचा मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेशमध्ये रविवारी सकाळी हा भीषण अपघात झाला आहे. कर्नूल जिल्ह्यातील वेलदुर्ती मंडळाजवळील मदारपूर गावात एका बस आणि ट्रकची जोरदार धडक झाली. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून वेगाने मदतकार्य सुरू आहे.

दरम्यान, चौघा जखमींची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना मदत केली.

Protected Content