आ. चंद्रकांत पाटलांचा पाठपुरावा : मेहुणच्या संत मुक्ताई देवस्थानला ‘ब’ दर्जा !

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आमदार चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील मेहुण येथील संत मुक्ताई देवस्थानाला तीर्थस्थळाचा ब दर्जा मिळाला आहे.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी पाठपुरावा केल्यामुळे मतदारसंघातील विविध कामे मार्गी लागत आहेत. यात तालुक्यातील तीर्थस्थळांच्या विकासाचे मोठे व्हिजन देखील त्यांनी आखले आहे. याच्या अंतर्गत विविध देवस्थानांच्या विकासाला गती देण्याचा त्यांचा संकल्प आहे. या अनुषंगाने मेहुण येथील संत मुक्ताई देवस्थानाला नुकताच तीर्थस्थळाचा ब दर्जा मिळालेला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांना या संदर्भातील प्रमाणपत्र नुकतेच राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे.

मेहुणच्या संत मुक्ताई देवस्थानाला ब दर्जा मिळाल्याने आता या देवस्थानासाठी राज्य शासनाकडून विविध निधींच्या माध्यमातून कामे करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या संदर्भात कामांना गती देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. तर, देवस्थानाला ब दर्जा दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचे आभार मानले आहेत.

Protected Content