यावल येथे तहसील कार्यालयात ‘जागतिक ग्राहक दिन’ उत्साहात

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील तहसील कार्यालयात विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व शासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत जागतिक ग्राहक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार महेश पवार हे होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ग्राहक कल्याण फाउंडेशनचे अध्यक्ष संजय झोपे, भारत गॅसचे संचालक माणीक भिरूड, एसटी महामंडळाचे संदीप अडकमोल, वजन माप कार्यालयाचे  कैलास पाटील, स्टेट बँकेच्या क्षिया चंदनकर, एचडीएफसीचे शाहरूख खान  व सतिष कापडे, संकेत आहिरे , आंनद नाईक , खरेदी विक्री संघाचे चेअरमन अमोल भिरड, अनिल जंजाळे, चंद्रकला इंगळे ,अलीम शेख  यांच्यासह तहसीलचे निवासी नायब तहसीलदार आर के पवार , तालुका पुरवठा निरिक्षक अंकीता वाघमळे, अव्वल कारकुन राजेश भंगाळे आदी जेष्ठ नागरिक आणि विविध राजकीय पक्षाची मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुरवठा विभागाचे राजेश भंगाळे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी केले.

यावेळी स्टेट बँकेच्या क्षिया चंदनकर, एचडीएफसीचे सतिस कापडे, बालकृष्ण वाणी , तहसीलदार महेश पवार यांनी ग्राहक हिताच्या दृष्टीने कार्यरत असलेल्या शासकीय  नियमांची सविस्तर माहीती देवुन समयोचित मार्गदर्शन केलीत. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे आभार राजेश भंगाळे यांनी मानले .

 

Protected Content