गुरे चोरटे टोळीचा बंदाबस्त करा; गौरक्षकांचे प्रांताधिकाऱ्यांना निवेदन

भुसावळ-लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | गुरे चोरणाऱ्या टोळीचा बंदोबस्त व्हावा यासाठी प्रांताधिकारी गौरक्षकांकडुन निवेदन देण्यात आले आहे. शहरातील गुरे चोरण्याचा प्रयत्न होत आहे. अशा चोरटयांचा बदोबंस्त व्हावा. भुसावळ शहरातील काही नागरिकांनी ही माहिती गौरक्षक रोहित महाले यांना दिली. मध्यरात्रीत चोर येऊन गौरक्षक आहोत असे खोटे नाव सांगुन गौमाता व गौवंश चोरी करण्याचा प्रकार समोर आला आहे व ही चोरटी टोळी परस्पर गौमातेची विक्री करतात.

या घटनेतील घडलेल्या भागातील कॅमेरे चेक केल्यास चोरटे पकडले जातील व त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी विनंती गौरक्षकांकडून करण्यात आलेली आहे. तरी नागरिकांना विनंती आहे आपल्या भागात असा प्रकार घडत असल्यास त्वरीत पोलीसांना कळवावे. जेणेकरून आपली गौमाता वाचेल असे आवाहन केलेले आहे, गौरक्षक रोहित महाले यांनी केलेल आहे. या निवेदनावर रोहित महाले, बल्लु थायडे, तुषार धोसेले, श्रीनील देशमुख यांचे नाव आहे.

Protected Content