मनोज जरांगे यांनी उपोषण घेतले मागे

आंतरवाली सराटी-लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण मागे घेतले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपोषण मागे घेत आहे असे मनोज जरांगे यावेळी म्हणाले. पुढच्या दोन दिवसात मनोज जरांगे आंदोलनाची दिशा ठरवणार आहे.

उपोषण मागे घेतले आहे पण साखळी उपोषण सुरू राहील अशी घोषणा त्यांनी या वेळी केली. त्यांच्यावर सध्या दोन गुन्हे दाखल झाले आहे. मराठा बांधवाच्या समजूतीनुसार त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर न जाता आज आंतरवाटी सराटी येथे दाखल झाले आहे. शांततेत धरणे आंदोलन सुरू ठेवा अशी विनंती त्यांनी केलेली आहे. आज संध्याकाळी ५ वाजता ते निर्णय घेणार आहे.

Protected Content