बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उद्घाटन

जळगाव प्रतिनिधी । भरारी फाऊंडेशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या बहिणाबाई महोत्सवाचे थाटात उदघाटन करण्यात आले.

बहिणाबाईंच्या नात सून पद्माबाई चौधरी, पणतीसून स्मिता चौधरी, अभिनेत्री प्रार्थना बेहडे, अभिनेत्री मेघा धाडे यांनी जाते फिरवून बहिणाबाई उत्सवाचे उद्घाटन केले. याप्रसंगी आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजेनिंबाळकर, भालचंद्र पाटील, रजनीकांत कोठारी अस्मिता पाटील, सीमा भोळे, नीशा जैन, कबीर सोनाळकर, भागवत भंगाळे, बाळासाहेब सूर्यवंशी, प्रीती रायसोनी, मुग्धा कुळकर्णी यांची उपस्थिती होती. भरारी फाउंडेशनचे दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले.

या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहिरी, भारूड, लग्नगीते, वहीगायन आदी लोककलांबरोबरच शालेय व महाविद्यालयीन युवा कलावंत पाच दिवस आपली कला सादर करणार आहे. प्रारंभी विनोद ढगे यांनी महाराष्ट्राचा पोवाडा सादर केला. यानंतर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व महिला विकासाच्या क्षेत्रात कार्य करणार्‍या व्यक्तींना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यात उमा क्षीरसागर (जालना), केतकी घाटे, मानसी करंदीकर (मुंबई), सरिता चितोडकर (पुणे), शीतल देशपांडे (पुणे), सुषमा प्रधान (जळगाव), अव्दैत दंडवते (जळगाव), वैशाली विसपुते (जळगाव), सपना श्रीवास्तव (जळगाव), श्रद्धा मुंदडा (जळगाव), रुबियाना तडवी (रावेर), कर्तव्य महिला बचत गट (चाळीसगाव). पुष्पलता मोरे, सूरज पाटील, राजेंद्र जंजाळे यांचा समावेश होता.

Add Comment

Protected Content