पीएसएलव्ही सी ४४ यानाचे यशस्वी प्रक्षेपण

श्रीहरीकोटा वृत्तसंस्था । भारतीय अवकाश संशोधन केंद्र म्हणजेच इस्त्रोने पीएसएलव्ही सी ४४ या यानाचे यशस्वी प्रक्षेपण केले असून यासोबत कलामसॅट आणि मायक्रोसॅट आर हे दोन उपग्रह अवकाशात झेपावले आहेत.

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून गुरुवारी रात्री ११.३७ वाजता पीएसएलव्हीसी – ४४ हे प्रक्षेपक मायक्रोसॅट-आर आणि कलामसॅट या उपग्रहांसह अवकाशात प्रक्षेपित करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच मायक्रोसॅट-आर त्याच्या निश्‍चित कक्षेत स्थिरावलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्रो प्रमुख के. सिवन यांनी आपल्या पथकाचं आणि देशाचं अभिनंदन केलं. तसेच त्यांनी देशभरातील विद्यार्थ्यांचं अभिनंदन केले आहे. भारतीय अवकाश संशोधन केंद्रासाठी हे उड्डाण महत्वाचे मानले जात आहे.

Add Comment

Protected Content