तळवेल येथे खा. रक्षा खडसे यांनी ग्रामस्थांशी साधला संवाद

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । रावेर लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवी महायुतीचे उमेदवार खा. रक्षा खडसे यांनी आज भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात श्री विठ्ठल मंदीरात दर्शन घेवून येथील ग्रामस्थांशी संवाद साधला.

सार्वत्रिक निवडणुक 2024 अनुषंगाने भाजपा नेते मंत्री गिरीश महाजन व आमदार संजय सावकारे यांच्या मार्गदर्शनात भुसावळ तालुक्यातील तळवेल येथे महायुतीचे उमेदवार रक्षा खडसे यांनी भेट दिली. सुरूवातील खा. रक्षा खडसे यांनी गावातील श्री विठ्ठल मंदीरात विठ्ठलाचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या अडीअडचणी सांगितलले. यावेळी खा. रक्षा खडसे यांनी राज्य व केंद्रीय योजनांची माहित देण्यात आली. याप्रसंगी त्यांच्यासह भारतीय जनता पाटील सह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content