कोळवद येथील नवरात्रोत्सव जल्लोषात

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील कोळवद येथे आई तुळजा भवानीची आरती आणि रावण दहनाचा कार्यक्रम यावल पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील आणि धनंजय चौधरी यांच्या हस्ते नुकताच पार पडला.

नवरात्री उत्सवाच्या भक्तीमय वातावरणात विजयादशमी दसरा असल्याने राज्य शासनाचे कोरोना संसर्गाची संभाव्य तिसरी लाटेच्या पार्श्वभुमीवर कोविड १९च्या नियमांचे काटेकोर अमलबजावणी पाळून या ठिकाणी रावण दहनाचे कार्यक्रम करण्यात आले.

या कार्यक्रमा प्रसंगी मधुकर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनील महाजन  मिठाराम महाजन, बंडु  महाजन, ग्रामीण काँग्रेस सेवा फाउंडेशनचे यावल तालुका अध्यक्ष अभय महाजन , समाजसेवक धिरज कुरकुरे , प्रसन्ना महाजन, चंदनदादा महाजन, वैभव महाजन, विक्कि महाजन, हितेंद्र महाजन, सौरभ  महाजन, अनुप महाजन, अतुल महाजन व कोळवद येथील ग्रामस्थ बांधव आणी मित्र परिवार या रावण दहनाच्या कार्यक्रमास उपस्थित होते.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!