लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल येथे जागतिक अन्न दिवस उत्साहात

जामनेर प्रतिनिधी । आज लॉर्ड गणेशा इंग्लिश स्कूल, जामनेर येथे जागतिक अन्न दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान शाळेचे मुख्याध्यापक धनंजय सिंग यांनी भूषविले. आजच्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी घरून येतांना वेगवेगळे अन्न पदार्थ तयार करून आणले होते. त्यात पारंपरिक, आधुनिक, मसालेदार, चटपटीत आणि आरोग्यवर्धक  अन्न पदार्थाचा समावेश होता. या वेळी झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन आणि सूत्रसंचालन प्रमोद सोनार यांनी केले. दत्ता देसले यांनी आहारातील पोषक घटकांचे महत्व, उपयोग आणि जीवन सतत्वाच्या कमतरते मुळे होणारे आजार व विकार या विषयी माहिती सांगितली. तसेच त्यांनी संतुलित आहाराचे महत्व विषद केले. या नंतर विद्यार्थ्यास दिपक राऊत यांनी ताजे अन्न पदार्थ,अन्न पदार्थाची पौष्टिकता वाढविण्याच्या पद्धती, ते टिकुन ठेवणे, साठविने या विषयीचे उपाय विद्यार्थ्यास सांगण्यात आले. तसेच जास्त शिजविलेले शिळे अन्न आरोग्यास कसे अपायकारक असते ते सांगण्यात आले.

 

Protected Content