शिवसेनेची पहिली यादी जाहीर; जळगाव ग्रामीण, पारोळा, पाचोर्‍याचा समावेश

jalgaon Shivsena

मुंबई प्रतिनिधी । शिवसेनेने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून यात जळगाव ग्रामीणमधून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोर्‍यातून किशोर पाटील तर पारोळ्यातून चिमणराव पाटलांचा समावेश आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षाच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यात ७० मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. यात जळगाव ग्रामीणमधून सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पाचोर्‍यातून किशोर पाटील तर पारोळ्यातून चिमणराव पाटील यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. दरम्यान, चोपडा येथून लताताई चंद्रकांत सोनवणे यांचे नाव पहिल्या यादीत नसले तरी त्यांची उमेदवारी निश्‍चित असल्याचे मानले जात असून दुसर्‍या यादीत त्यांचे नाव असू शकते.

Protected Content