Home क्रीडा जळगावात क्रिकेटचा महासंग्राम! ऑल इंडिया कंजरभाट दिवस-रात्र स्पर्धेला उत्साहात सुरुवात

जळगावात क्रिकेटचा महासंग्राम! ऑल इंडिया कंजरभाट दिवस-रात्र स्पर्धेला उत्साहात सुरुवात

0
1

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  येथील जी. एस. मैदानावर ऑल इंडिया कंजरभाट जातीय दिवस-रात्र क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, या भव्य स्पर्धेचे उद्घाटन नरडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल नेतलेकर आणि लखन नेतलेकर यांच्या हस्ते अत्यंत उत्साहात पार पडले. दिनांक १३ ते १६ नोव्हेंबर दरम्यान या दिवस-रात्र सामन्यांचा थरार रंगणार असून, १६ नोव्हेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम (फायनल) सामना खेळवला जाणार आहे. या उद्घाटन सोहळ्याला बिरजू नेतलेकर, मोहन गारुंगे, नरेश बागडे, शशिकांत बागडे, मोहन चव्हाण, संजय मोती, प्रदीप नेतलेकर, योगेश बागडे, मंगल गुमाने, संतोष गारुंगे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

उद्घाटनप्रसंगी उपस्थितांना राहुल नेतलेकर यांनी मार्गदर्शन केले. या स्पर्धेत जळगावसह नंदुरबार, कोल्हापूर, पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि गुजरातमधील अहमदाबाद येथून एकूण १२ संघांनी सहभाग नोंदवला आहे. विविध शहरांतील समाजबांधव एकाच मैदानावर एकत्र आल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले असून क्रीडाप्रेमींमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

या स्पर्धेतील विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. स्व. गणेश नेतलेकर यांच्या स्मरणार्थ लखन नेतलेकर व राहुल नेतलेकर (भाईराजा ग्रुप, नरडाणा) यांच्यातर्फे प्रथम क्रमांकाच्या विजेत्या संघास ५५ हजार ५५५ रुपये आणि द्वितीय क्रमांकाच्या संघास ३३ हजार ३३३ रुपये रोख बक्षीस देण्यात येणार आहे. यासह इतर विविध वैयक्तिक आणि सांघिक बक्षिसांसह एकूण १ लाख रुपयांपर्यंतची रोख पारितोषिके ठेवण्यात आली आहेत. क्रीडास्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना एकत्र आणण्याचा हा उपक्रम सर्वत्र कौतुकास्पद ठरत असून, स्पर्धेच्या यशस्वितेसाठी कार्तिक बाटुंगे, राज नेतलेकर, गणेश बागडे, राज गागडे, गौतम टीलंगे, गोविंद दहियेकर यांच्यासह सर्व युवकांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.


Protected Content

Play sound