निसर्गोपचार तज्ञ डॉ.स्वागत तोडकर यांचे पुण्यात व्याख्यान

पुणे लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी |  दि.८ ते १० जून रोजी कात्रज पुणे येथे सुप्रसिद्ध निसर्गोपचार तज्ञ डॉ.स्वागत तोडकर यांचे पुणे येथे ‘मोफत घरगुती निसर्गोपचार पद्धतीने निरोगी आयुष्य कसे जगावे ?’ या विषयावर व्याख्यान संपन्न झालं,

या प्रसंगी त्यांनी घरगुती पद्धतीने अनेक आजारावर उपचार करण्याबाबत निरोगी व आरोग्यदायी आयुष जगण्या बाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी नागरिकांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. नुकताच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते डॉ.स्वागत तोडकर यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबदल सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष प्रा.संजय मोरे आणि जळगाव जिल्हा अध्यक्ष कृष्णा सावळे यांनी शाल श्रीफळ बुके देऊन सत्कार केला. डॉ स्वागत तोडकर यांनी घरगुती उपचार करण्याबाबत मार्गदर्शन केले तर प्रा. संजय मोरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी डॉ.राजेंद्र हुंडे, डॉ. दिपाली ठाकुर, प्रा. संजय मोरे सर्व शक्ती सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्य सचिव तथा भारतीय दलित साहित्य अकादमी, दिल्ली महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष विनायक जाधव तोडकर संजीवनी महाव्यवस्थापक, मायाताई मोरे कृष्णा सावळे, मयुर कोळी, अनिल गायकवाड,  वैशाली गायकवाड, आनंद गायकवाड, मनन गायकवाड, सुशील तायडे, हुसेन बोहरा, धनराज  सोनवणे यांच्यासह रुग्ण उपस्थित होते.

Protected Content