कोरोना : माजी खासदार वसंतराव मोरे यांची ५१ हजार रूपयांची मदत

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील माजी खासदार काकासाहेब वसंतराव मोरे व काकूसो संध्या मोरे यांचा वाढदिवस असल्याने यांचा आज १ एप्रिल रोजी त्यांनी ५१ हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा केले आहे.

जगभरात करोना व्हायरसने कहर केला आहे. जगभर करोनाची दहशत पसरली असून भारतात व त्यातल्या त्यात महाराष्ट्राची चिंताजनक परिस्तिथी निर्माण झाली आहे. सामाजिक अंतर ठेवणे म्हणजे विलगीकरण हाच महामारीवर उपाय आहे. म्हणूनच यंदा हितचिंतकांनी वाढदिवसाचे कोणतेही कार्यक्रम न करण्याचे आव्हान काकासाहेब व मोरे परिवाराने केले आहेत. त्याच अनुशंगाने माझ्या भेटीला प्रत्यक्ष न येता फोनवरून शुभेच्छा स्वीकारल्या जातील असे आव्हान देखिल करण्यात आले. करोना या महामारीच्या हद्दपार करण्यासाठी काकासाहेब यांनी ५१ हजार रूपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधी जमा केला आहे. वाढदिवसाचा पूर्वसंध्येला करोनाचे महामारीचे संकट लवकर टळून जावो अशी भावना व्यक्त करताना लोकांनी आपल्या घरीच थांबून करोना विरुद्धचा लढा यशस्वी करण्यासाठी केंद्र व राज्य शासनाचे आदेश पाळावे असे नागरिकांना विनम्र आव्हान केले आहेत.

 

जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !
फेसबुक पेज : https://bit.ly/2QSCeHB

युट्यूब पेज : https://bit.ly/2UuRmx3

 

Protected Content