दिल्ली ‘मरकज’ प्रकरणी मौलानासह काही जणांवर गुन्हा दाखल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) दिल्लीतील मरकजमध्ये धार्मिक कार्यक्रमाच्या आयोजनावरुन मौलाना मोहम्मद साद कांधलवी आणि तब्लिगी जमातच्या इतर काही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन आहे. त्यामुळे अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. परंतू दिल्लीतील मरकजमध्ये मार्च महिन्यात एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि तोच कार्यक्रम देशात कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा प्रमुख स्रोत बनला. COVID-19 च्या पार्श्वभूमीवर निजामुद्दीच्या मरकजमध्ये सर्व कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. परंतु आदेशाचे उल्लंघन करत कार्यक्रमाचे आयोजन झाले होते. त्यामुळे महामारी कायदा 1897 आणि भारतीय दंड विधानांच्या कलमांनुसार गुन्ह्याची नोंद झाली आहे. दरम्यान, ‘तबलीग-ए-जमात’ कार्यक्रमात सहभागी होऊन महाराष्ट्रात परतलेल्या शेकडो जणांचा शाेध सुरू आहे. मुंबईतील ४३१ जण, पुणे-पिंपरीचे १३६ जण कार्यक्रमात सहभागी झाल्याचे समजते.

 

जिल्ह्यातील प्रत्येक बातमी आता आपल्या स्मार्टफोनवर !

वेबसाईट : https://livetrends.news

फेसबुक पेज : https://www.facebook.com/livetrendsnews01

व्हाटसअ‍ॅप क्रमांक : ९३७०४०३२००

Protected Content