सावद्यात संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

सावदा, ता. रावेर प्रतिनिधी  येथे आज नाभिक समाजातर्फे श्री संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

 

सावदा  येथे आज नाभिक समाजाच्या श्री संत सेना महाराज पुण्यतिथि चा कार्यक्रम साजरा करण्यात आला. प्रथम श्री संतसेना महाराज यांच्या पावन चरणी अभिवादन करुन कार्यक्रमची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सतीश महाजन हे होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी संत सेना महाराजांचा जयजयकार केला.

याप्रसंगी सावदा नाभिक समाज मंडळ यांची नविन कार्यकारणी जाहिर करण्यात आली नविन  कार्यकारणी पुढीलप्रमाणे अध्यक्ष-सतीश महाजन; उपाध्यक्ष- युवराज सापकर सचिव- युवराज इंगळे;  सहसचिव- किरण येवले;  सदस्य – महेश सापकर, महेंद्र सापकर,प्रकाश सापकर ,मिलिंद सापकर, प्रकाश चांदवे. नवनियुक्ती कार्यकारिणीचे समाजबांधवांनी अभिनंदन केले आहे. प्रस्तावना युवराज इंगळे यांनी सादर केली, तर  महाजन यांनी आभार व्यक्त केले

Protected Content