डॉ. बेंडाळे महाविद्यालयात संविधान दिनानिमित्त विविध उपक्रम

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । डॉ. अण्णासाहेब जी डी बेंडाळे महिला महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संविधान दिवस साजरा करण्यात आला. संविधान दिनानिमित्त आज दिवसभरात महाविद्यालयात संविधानाच्या उद्देश पत्रिकेचे सामूहिक वाचन, पथनाट्य, व्याख्यान कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. मोईन शेख यांनी भारतीय संविधानाचे महत्व विषद केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर, देशाला एक मजबूत संविधान प्रदान करण्याचे सर्वात मोठे काम होते. ज्याचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला होता. जगातील विविध देशांच्या राज्यघटनेतील विशेष गोष्टी भारतीय संविधानात मिसळून सशक्त आणि न्याय्य प्राप्त झाल्या आहेत असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्राचार्य आदरणीय डॉ गौरी राणे यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेप्रमाणे भारत हे सार्वभौम (Sovereign) , समाजवादी (Socialist), धर्मनिरपेक्ष (Secular), लोकशाही (Democratic) प्रजासत्ताक (Republic) आहे. भारतातील आज सर्वांना विकासाची समान संधी राज्यघटनेमुळेच प्राप्त झालेली आहे. आणि भारताचे संविधान हे जगातील सर्वात श्रेष्ठ संविधान आहे असे मत मांडले. सदर कार्यक्रमप्रसंगी संविधानाच्या सरनाम्याचे सामूहिक वाचन करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. अनिल बेलसरे यांनी केले तर प्रा. दिपक किनगे यांनी आभार व्यक्त केले. तसेच 26-11 रोजी दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यात शहीद झालेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

दुपारी ३ वाजता महाविद्यालयातील प्राध्यापक प्रबोधिनी आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिनानिमित्त प्राचार्य नंदकुमार भारंबे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यामध्ये त्यांनी भारतीय संविधानाचे महत्त्व, भारतीय जनतेच्या जीवनातील लोकशाहीचे मूल्य, भारतीय राज्यघटनेने नागरिकांना दिलेले हक्क व अधिकार , भारतातील पंचायत राज व्यवस्था याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्य आदरणीय डॉक्टर गौरी राणे, कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्य प्रा सुनिता पाटील, प्राध्यापक प्रबोधिनीचे प्रमुख प्राध्यापक ए. पी. सरोदे, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. एस एस राजपूत आणि महाविद्यालयातील प्राध्यापक बंधू भगिनी, प्राध्यापकेत्तर कर्मचारी व मोठ्या संख्येने रासोयो स्वयंसेविका उपस्थित होत्या.

Protected Content