अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । शहरातील सागर पार्क जवळ भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीवरील तरुणाचे नाक, जबडा, डोळ्याला जबर दुखापत झाली. हा या प्रकरणी गुरुवार २१ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजता रामानंद नगर पोलिस ठाण्यात अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रामानंद नगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,
मजुरी काम करणारे अंकुश बाळू निकम (२८, रा. सुप्रिम कॉलनी) हा तरुण १२ डिसेंबर रोजी संध्याकाळी दुचाकीने (क्र. एमएच १९, एफएक्स ८६०७) जात असताना सागर पार्कसमोर अज्ञात वाहनाने धडक दिली. यात दुचाकीचे मोठे नुकसान होण्यासह निकम यांच्या नाक, जबडा, डोळ्याला दुखापत झाली. उपचारानंतर निकम यांनी या प्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुरुवारी २१ डिसेंबर रोजी सायंकाळी रात्री ८ वाजता अज्ञात वाहनधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ उषा सोनवणे करत आहेत.

Protected Content